शाळेला 21 हजारांची देणगी देऊन वडिलांचा ‘प्रथम स्मृतिदिन’ साजरा

दौंड : तर्कशुद्ध विचार पध्दतीचा अवलंब करत, बुद्धीप्रामाण्यवाद्याची कास धरत आणि महाराष्ट्राची पुरोगामी विचारांचा वारसा- परंपरा जपत, आज रावणगाव (ता.दौंड जि.पुणे) येथील पद्माकर कांबळे यांनी आपल्या शिक्षक असलेल्या वडिलांचा प्रथम स्मृतिदिन धार्मिक विधी- शोकसभा यांचा खर्च टाळत त्यातील 12 हजार रुपयांचा निधी रावणगाव येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयास देणगी स्वरुपात देऊन आपल्याला वडिलांना अनोख्या पद्धतीने आपल्या आदरांजली वाहिली आहे

रावणगाव परिसरातील अश्या प्रकारची हि पहिलीच घटना असून या उपक्रमावेळी पद्माकर कांबळे आणि त्यांचे बंधू विकास कांबळे व त्यांच्या सुविद्य मातोश्री, कुटुंबातील इतर सदस्य उपस्थित होते तसेच कार्यक्रमास सरस्वती विद्यालय रावणगाव येथील मुख्याध्यापक विजयकुमार आटोळे, ए.डी.रांधवण सर, दत्तात्रय इवरे सर इतर शिक्षकवृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शाळेला निधी सुपूर्द करताना माजी उपसभापती व दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा गट) चे अध्यक्ष उत्तमराव आटोळे, माजी चेअरमन मुगाजी दादाराम आटोळे, उपसरपंच पोपट फाजगे बाबुराव कांबळे, समाजसेवक जितेंद्र नेमाडे, अमित रांधवण,नवनाथ आटोळे, सागर गावडे, शिवलाल शेळके, दत्तात्रय आटोळे, दीपक चव्हाण, नारायण फाजगे, तसेच इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.