Breaking | संभाजी भिडे यांना ‛ते’ वक्तव्य भोवलं, अखेर भिडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल

अमरावती : महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या संभाजी भिडे यांच्याविरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संभाजी भिडे हे या अगोदरही विविध विधानांमुळे चर्चेत राहिले आहेत.

अमरावती मध्ये संभाजी भिडे यांच्या विरोधात कलम 153, 505(2) त्यासोबतच आयोजक यांच्यावर सुद्धा 34 (अ) अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. यासंबंधी अधिकृत माहिती पोलीस उपायुक्त विक्रम साळी यांनी दिली आहे. महात्मा गांधी यांच्याविषयी केलेले वक्तव्य संभाजी भिडे यांना भोवले आहे. त्यांच्याबरोबरच त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणाऱ्यांविरोधात देखील गुन्हा नोंद करण्यात आला आहे

संभाजी भिडे यांच्या वक्तव्यानंतर संपूर्ण राज्यात विविध ठिकाणी निदर्शने करण्यात येत असून पुणे, मुंबई आणि इतर शहरांमध्ये काँग्रेस पक्षाकडून निदर्शने करण्यात येऊन भिडे यांचा निषेध केला जात आहे.