Breaking News : अजित पवारांच्या निकटवर्तीयांच्या साखर कारखान्यांवर छापे, दौंड तालुक्यातील कारखाण्याचाही समावेश



पुणे : पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातील विविध साखर कारखान्यांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या असून या धाडींमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या कारखान्यांचा समावेश असल्याचे समोर येत आहे.

दौंड तालुक्यातही या धाडी टाकण्यात आला असून यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निकटवर्तीय असलेल्या खाजगी साखर कारखाना असलेल्या दौंड शुगरवरही आयकर विभागाने छापा मारला आहे.

आयकर विभागाची ही कारवाई सकाळी 6 पासून सुरू असून यात 6 ते 7 अधिकारी चौकशी करीत असल्याची माहिती मिळत आहे.  महत्वाचे अधिक वृत्त थोड्याच वेळात देत आहोत…