Breaking News | जो बायडन यांची अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार, कमला हॅरिस यांना मिळणार संधी

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष जो बायडन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांनी याबाबत माहिती देताना, माझ्या सहकारी डेमोक्रॅटांनो, मी नामांकन न स्वीकारण्याचा आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझी सर्व शक्ती माझ्या कर्तव्यांवर केंद्रित करण्याचा निर्णय घेतला असल्याचे म्हटले आहे.

तसेच आपण 2020 मध्ये पक्षाचे उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय म्हणजे कमला हॅरिसची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता. आणि मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे असे त्यांनी म्हटले आहे.

पुढे याबाबत विस्तृत माहिती देताना त्यांनी आज मी कमला यांना या वर्षी आमच्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि समर्थन देऊ इच्छितो असे जाहीर केले आहे. डेमोक्रॅट्स – एकत्र येण्याची आणि ट्रम्पला पराभूत करण्याची वेळ आली आहे असे त्यांनी शेवटी म्हटले आहे.

भारतात आनंद : कमला हॅरिस ह्या भारतीय वंशाच्या असल्याने भारतात या निर्णयाने आनंद साजरा होत आहे. कमला हॅरिस यांच्या नावामुळे बायडन यांच्या डेमोक्रॅटिक पक्षात नव चैतन्य पहायला मिळत आहे.