Breaking News : पुणे-सोलापूर हायवेवरील ‘वाखारी’ गावाजवळ फ्रिज घेऊन जाणाऱ्या कंटेनरला भिषण आग, साधारण 40 लाखांचे नुकसान!

दौंड : पुणे सोलापूर महामार्गावरील वाखारी (ता.दौंड) येथे फ्रिज घेऊन जाणाऱ्या कंटेनरला अचानक आग लागल्याने एकच खळबळ माजली आहे. या आगीत साधारण 40 लाखांचे नुकसान झाले असल्याची माहिती वाहन चालक देत असून अजून नुकसान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न अजूनही सुरु आहेत.

साधारण 11:30 च्या दरम्यान या कंटेनरला आग लागल्याची माहिती प्रत्यक्ष दर्शिकडून मिळत असून या फ्रिज घेऊन जाणाऱ्या कंटेनरला आग लागल्यानंतर यवत, केडगाव पोलिसांनी अगोदर स्थानिकांच्या मदतीने पाणी मारून आग विझविण्याचा प्रयत्न केला मात्र आग आटोक्यात येत नसल्याने अग्निशमन दलाचे बंब बोलविण्यात आले.

आग विझविण्याचे बंब बोलविण्यात आल्यानंतर कंटेनरमधील अनेक फ्रिज बाहेर काढण्यात यश आले मात्र आग आटोक्यात येत नसल्याने जवळच्या वाशिंग सेंटरच्या पाण्याचाही वापर करण्यात येत आहे. आत्ता सध्या दुपारी 1:00 वाजेपर्यंत आग विझविण्याचे काम सुरूच असून अधिक वृत्त थोड्याच वेळात प्रसिद्ध करत आहोत.