दौंड (देऊळगावराजे) : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मा. खा. राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या आंदोलनास दौंड तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळाला. देऊळगांव राजे येथे दौंड तालुक्यातील पूर्व भागातील वडगाव, पेड़गाव, शिरापुर, हिंगनी, आलेगाव ,बोरिबेल,काळेवाडी या गावातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने देऊळगाव येथे हिंगनी चौकात शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष राजाभाऊ कदम यांना सर्व शेतकऱ्यांनी दुधाने अंघोळ घातली.
मार्च महिन्यात जवळपास ३२रु. प्रति लिटर मिळणारा बाजार आज १८रु. यावर आला असल्याने एक तर कोरोना आजाराने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित बिघडले असताना ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून केला जाणार दूध व्यवसाय सरकारच्या निराशादायी धोरणामुळे डबघाईस आला आहे, त्यामुळे या प्रति लिटर किमान १०रुपये तरी दरवाढ देऊन शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढावे अशी मागणी या वेळी सरकारकडे या वेळी करण्यात आली, परिसरातील सर्व डेअरी मालकांनी आज दूध संकलन केले नाही.
या वेळी परिसरातील सर्व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी घोषणा बाजी करून सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला, या वेळी जनार्धन आवचर, अभिमन्यू गिरमकर, गणेश माने, सतीश आवचर, जालिंदर सूर्यवंशी, चेतन औताडे,सतीश कोल्हे,बाबू घाडगे, राजेंद्र गिरमकर, अर्जुन सूर्यवंशी आणि परिसरातील दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.