दौंड : सहकारनामा ऑनलाईन
कुरकुंभ ता.दौंड येथे एक कोरोना बाधित रुग्ण सापडला अशी मोठी अफवा पसरली होती आता अफवेला खुद्द दौंडच्या आरोग्य अधिकाऱ्यांनीच पूर्ण विराम देत कुणीही कुरकुंभ येथील त्या व्यक्तीबाबत कोणत्याही प्रकारची अफवा पसरवू नये तसेच सोशल मीडियावर फैलावण्यात येणाऱ्या अफवांवर कुणी विश्वास ठेवू नये असे आवाहन केले आहे.
याबाबत डॉक्टरांनी दिलेल्या माहिती नुसार कुरकुंभ येथील एका संशयीत रुग्णाला तपासणीसाठी पुणे येथील ससुन रुग्णालयात गुरुवार दि.९ एप्रिल रोजी दाखल करण्यात आले होते. या रुग्णाची कोरोना टेस्ट केल्यानंतर त्या रुग्णाचा रिपोर्ट हा निगेटीव्ह निघाला आहे अशी माहीती दौंड ऊपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. डांगे आणि दौंड तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रासगे यांनी दिली. दरम्यान कोरोनाची चाचणी आता पुणे येथील नायडू रुग्णालयासह ससुन रुग्णालय आणि औंध येथे देखील सुरु झाली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.