देऊळगाव राजे : सहकारनामा ऑनलाईन (प्रशांत वाबळे)
देऊळगाव राजे गावठाण हद्दीत अष्टविनायक रोडचे काम सुरू आहे. रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचा बाजूने जाणाऱ्या विधुत वाहक तारा रस्त्याच्या बाजूने जाणारे सांडपाण्याचे गटार इत्यादी हटविले नाही.
संबंधित बाबी वेळोवेळी ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या निदर्शनास ग्रामपंचायत प्रशासनाने आणून दिल्या होत्या तरीही ठेकेदाराने गावठाण हद्दीत काम सुरूच ठेवले होते.
त्याचा परिणाम आज सकाळी देऊळगाव येथे विधुत वाहक खांबाच्या कडेच्या एका खांबाचा ताण तुटल्याने रस्त्याचे काम सुरू असतानाच एक खांब अचानक रस्त्याच्या बाजूने झुकला दैव बलवत्तर म्हणून पुढील अनर्थ टळला. मात्र असाच काहीसा प्रकार पुढेही पाहायला मिळाला, एका ठिकाणी मैलापाणी वाहून नेणारे गटार फुटल्याने ते पाणी लोकवस्तीतच वाहू लागले.
उभा अशा नियोजनशून्य कामामुळे नागरिकांच्या आरोग्याला व जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी संबंधित ठेकेदारावर सक्त कारवाई करून रस्त्याच्या बाजूच्या विधुत वाहक तारा सुरक्षित ठिकाणी हलविल्याशिवाय गावठाण हद्दीत रस्त्याचे काम न करण्यासंबंधीचे आदेश देण्याची मागणी ग्रामस्थांंनकडून होत आहे.
विधुतवाहक तारा, मैलापाणी गटार सुरक्षित ठिकाणी हलविल्याशिवाय रस्त्याचे पुढील काम न करण्याचा सूचना ठेकेदाराला देण्याचे आल्या असल्याची माहिती महारुद्र खबिले, उप अभियंता – सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिली आहे.