दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्र.७ मधील आठ जवानांना कोरोना संसर्ग झाल्याने त्यांच्यावर पुणे येथे ऊपचार सुरु आहेत. या आठ जवानांचा संपर्क अन्य पाच जवनांसोबत आला होता. दरम्यान या पाच जवानांचे घशातील द्रव नमुने पुणे येथे तपासण्यासाठी पाठविण्यात आले होते. या पाच जवानांपैकी एका जवानाची चाचणी पाॕझीटीव्ह आली आहे तर ऊर्वरीत चार जवानांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. परिणामी दहिटणे येथील एक रुग्ण आणि दौंड येथील नऊ रुग्ण अशी एकुण रुग्णांची संख्या दहा झाली असल्याचे ऊपजिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे आधिक्षक डाॕ. संग्राम डांगे यांनी दिली. जनतेने आरोग्याची काळजी घ्यावी शासनाचे नियम पाळावे असे आवहान डाॕ डांगे यांनी केले आहे