Categories: Previos News

संचारबंदीतही ‛दौंड’ मध्ये हाणामारी करणारा रेकॉर्डवरील गुंड ‛तडीपार’



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

ज्या इसमावर पूर्वी गुन्हा दाखल आहे व त्याने पुन्हा उपद्रवमुल्ये सुरूच ठेऊन पुन्हा गुन्हा केल्यास त्यास आता दौंड पोलिसांकडून तात्काळ तडीपार करण्याची कारवाई करण्यात येत आहे.

असाच प्रकार दौंड पोलीस ठाणे हद्दीत घडला आहे. रेकॉर्डवरील गुंड जालिंदर विष्णू धोत्रे (वय 27 वर्षे राहणार वडार गल्ली, दौंड) याच्यावर दंगल करणे, दुखापत करणे, संघटितपणे वाळू चोरी करणे, महिलांचे विनयभंग करणे, गर्दी मारामारी करणे या प्रकारचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करून सुद्धा तो आपले गुन्हेगारी कर्तुत्व सोडण्यास तयार नव्हता. त्यामुळे त्याचा तडीपारीचा प्रस्ताव माननीय उपविभागीय अधिकारी श्री गायकवाड पुरंदर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यांनी सदर इसमास पुणे ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षाकरता तडीपार केले आहे. सदर इसमाने दोन दिवसांपूर्वी  कोरोना रोगाचा प्रादुर्भाव रोखणेकामी बंदोबस्त चालू असताना व शहरांमध्ये संचारबंदी लागू असतानाही गोवा गल्ली व वडार गल्लीतील काही मुले घेऊन दंगलसदृश मारामारी केली होती. त्यामुळे दौंड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल झालेले आहेत. सदर इसम शुल्लक कारणावरून दौंडच्या काही भागात तणाव निर्माण करत असल्याने संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर त्याच्यावर तात्काळ तडीपारीचा आदेश बजावण्यात आला. सदर कारवाई पोलीस निरीक्षक सुनील महाडिक, ए.एस.आय भाकरे, पोलीस नाईक बोराडे, पोलीस हवालदार आसिफ शेख, पोलीस शिपाई वाघ यांनी केली आहे.

Sahkarnama

Recent Posts

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

23 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago