Categories: Previos News

संचारबंदी काळात पोलीसांनी विनाकारण नागरिकांना मारहाण करू नये : आ.राहुल कुल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)

संचारबंदी काळामध्ये पोलिसांनी अमलबजावणी करताना दिसेल त्या नागरिकाला विनाकारण मारहाण करू नये तर अगोदर त्यांना समजून सांगण्यात यावे आणि तरीही ते ऐकत नसतील  तरच मग पुढील सक्ती करावी अश्या सूचना दौंडचे आमदार राहुल कुल यांनी मांडताना नागरिकांनीही गरज नसताना विनाकारण घरा बाहेर पडू नये, हे सर्व तुमच्या सुरक्षिततेसाठीच सुरू असून पोलीस यंत्रणेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे. ते दौंड तालुक्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून सुरु असलेल्या विविध उपाय योजनेसंदर्भात दौंड येथील बैठकीत बोलत होते. या बैठकीमध्ये कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांवर चर्चा करण्यात आली त्यामध्ये प्रामुख्याने खालील मुद्दे घेण्यात आले

> गेल्या काही दिवसात वेगवेगळ्या भागातून येणारे सुमारे २८९० लोक दौंड तालुक्यात दाखल झाले झाले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाद्वारे त्यांची तपासणी करण्याची प्रक्रिया सुरु आहे. 

> दौंड तालुक्यात विलगीकरचा सल्ला दिलेले दोन रुग्ण आहेत त्यांना नायडू मध्ये दाखल करून घेतले नसून, खबरदारी म्हणून त्यांना पुन्हा पाठविण्याची व्यवस्था करत आहोत. 

> कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाद्वारे अधिक तपासणी कीट उपलब्ध करून देण्यात यावेत अशी मागणी आपण केली आहे. 

> तालुक्यातील १०८ रुग्णवाहिका चालक अडचणीचा च्या वेळी उपलब्ध असावेत यासाठी त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

> संचार बंदीच्या पार्श्वभूमीवर दूध पुरवठा सुरळीत सुरु राहावा यासाठी तालुक्यातील दुध उत्पादक शेतकऱ्यांना पास देण्यात येणार असून यामुळे दुधाची वाहतूक सुरु राहील तसेच शेतीसाठी आवश्यक यंत्रसामुग्रीला डीझेलसाठी देखील व्यवस्था करून त्यांचे पास संबंधित गावाचे मंडल अधिकारी यांचेकडे देण्यात येणार आहे. 

> तालुक्यातील गरीब कुटुंब किंवा स्वत धान्य दुकानांवर अवलंबून असणाऱ्या नागरिकांना धान्य घरपोच मिळावे यासाठी त्यांना मदत करण्यासाठी ची व्यवस्था करण्यासाठी तालुक्यातील रेशन दुकानदारांना विनंती केली असून या संबंधी पुढील व्यवस्था करणे, यादी करण्याबाबत देखील त्यांना कळविण्यात आले आहे.

> भाजीपाला, फळ विक्रेते यांना हातगाडी किंवा वाहनावर बसून नागरिकांशी सुरक्षित अंतरावरून विक्री करता यावी यासाठी दुकानांपुढे पांढरे पट्ट्या आखून भाजीपाला विकण्याच्या सूचना देण्यात येतील. 

> गॅस सिलेंडर घरपोच देण्यासंबंधी सर्व एजन्सी धारकांना सूचना करण्यात आलेल्या आहेत.

> व्यापारी महासंघ, किराणा मालाचे व्यापारी , केमिस्ट असोशियेषण यांचेशी चर्चा करून योग्य नियोजन करण्यात आले असून त्यांना बाहेरून येणारा माल कमी पडू नये तसेच त्यांचेकडून ग्राहकाला कोणताही माल कमी पडू याची खबरदारी घेण्यात येणार आहे. हि साखळी विनाखंड सुरु ठेवली जाईल.   

> दौंड रेलवे स्थानकावर जे प्रवासी अडकून पडलेले आहेत त्यांची राहण्याची व इतर व्यवस्था करण्यासाठी रेल्वे प्रबंधक यांचेशी बोलणे केले असून त्याची व्यवस्था देखील करण्यात येणार आहे. याव्यतिरिक विविध उपायोजना तसेच शासनाकडून येणाऱ्या विविध सूचनांबाबत मी विविध माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत राहणार असल्याचे  आ.कुल यांनी सांगत तालुक्यातील संपूर्ण परिस्थीवर आपण स्वतः जातीने लक्ष ठेऊन असून नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता संयम बाळगावा आणि दिलेल्या सूचनांचे पालन करावे कारण पुढील ३ आठवडे कठीण असले तरीही आपण सर्व मिळून लवकरच या संकटाला मात देऊ असा  विश्वासही शेवटी व्यक्त केला आहे.

Sahkarnama

View Comments

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

17 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago