दौंड : सहकारनामा ऑनलाइन –
दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वेस्टेशन उद्यान एक्सप्रेसच्या धडकेत केडगाव येथील तरुणाचा मृत्यू झाला आहे. गणेश हिरामण शेलार (वय ४६ रा.केडगाव ता.दौंड) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून ते जवाहरलाल माध्यमिक विद्यालयात क्लार्क पदावर काम करत होते. दुपारी दीड वाजता मुंबईवरून बँगलोरकडे जाणाऱ्या उद्यान एक्स्प्रेसची जोराची धडक बसून त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत होते. घडलेली घटना नेमकी अपघात आहे की आत्महत्या हे मात्र अजून समजू शकले नाही. गणेश शेलार यांच्या मागे त्यांचे आई, वडील, पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.