थेऊर : सहकारनामा (शरद पुजारी)
– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लाॕकडाऊन केल्या मुळे ग्रामीण भागात मोलमजूरी करुन आपल्या कुंटुंबाचा उदार्निवाह करणाऱ्या शेतमजूर,बांधकाम कामगार, परराज्यातून आलेले तसेच इतर जिल्ह्यातून गावांमध्ये उदरनिर्वाहासाठी आलेले नागरिक यांना या काळात उपसामारीची वेळ आली होती बंदच्या काळात दोन वेळचे जेवण कस करायच असा प्रश्न याच्यापुढे होता परंतु पूर्व हवेलीतील थेऊर, कुंजीरवाडीसह अनेक गावातील स्वंयमसेवी संस्था या नागरिकांच्या मदतीला धावून आल्या असून अन्नदान तसेच किराणामाल मोफत देण्यासाठी पुढाकार घेऊन अशा नागरिकांना घरपोच अन्नधान्याचा पुरवठा केला आहे.
यात कुंजीरवाडीच्या सरपंच सुनिता धुमाळ यांनी त्यांच्या परिस फाउंडेशन, स्वामी समर्थ दरबारचे बबन तुपे, वसंत कुंजीर, फाउंडेशनचे स्वप्निल कुंजीर यांनी कुंजीरवाडी गावातील नागरिकांना तसेच थेऊरमधील नागरिकांना चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आनंद ताबे, थेऊरचे माजी सरपंच नवनाथ काकडे, महाराष्ट्र राज्य पञकार संघ पुणे जिल्हा अध्यक्ष सिताराम लांडगे, गुरुकृपा सेवा फाऊंडेशन यांच्या वतीने कोलवडीत शंभर कुटुंबांना पंधरा दिवस पुरेल इतका शिधा.त्याचप्रमाणे लोणी काळभोर ग्रामपंचायत व महसूल विभाग थेऊर यांच्या वतीने बाहेर गावी निघालेल्या नागरिकांना लोणी येथील राजलक्ष्मी कार्यालयात राहाण्याची जेवनाची व औषध उपचाराची सोय करण्यात आली यावेळी हवेली उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ सई भोरे पाटील व लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पाहणी केली मंडलाधिकारी गौरी तेलंग ,ग्रामसेवक डी. के .पवार, तलाठी सुजेत झंजे, थेऊरचे तलाठी दिलिप पलांडे, गणेश गायकवाड, कमलेश काळभोर, लोणीकाळभोर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.