अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारीच्या मुसक्या आवळल्या, आज भारतात आणण्याची शक्यता



नवी दिल्ली : वृत्त संस्था 

रॉ आणि कर्नाटक पोलिसांच्या प्रयत्नानंतर अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल मधून अटक करण्यात आली असल्याचे वृत्त असून सध्या रॉचे अधिकारी आणि कर्नाटक पोलीस सेनेगलमध्ये उपस्थित आहेत. हे अधिकारी त्याच्या प्रत्यापर्णाची तयारी करत आहेत. रवी पुजारी याच्यावर महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये तब्बल ९८ गुन्हे दाखल आहेत.

अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी अँटोनी फर्नाडीस या

नावाने पासपोर्ट तयार करुन सेनेगलमध्ये रहात होता. हा पासपोर्ट १० जुलै २०१३ मध्ये जारी करण्यात आला होता. तो ८ जुलै २०२३ पर्यंत वैध आहे. गेल्या वर्षी जूनमध्ये सेनेगल कोर्टातून जामीन मिळाल्यावर रवी पुजारी फरार झाला होता. पुजारी याला २१ जानेवारी २०१९ रोजी सेनेगलमध्ये अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याला जामीन मिळाल्याने तो फरार झाला होता. मात्र तो सेनेगलमध्येच रहात होता.

भारतीय एजन्सी त्याच्यावर सातत्याने नजर

ठेवून होती. रवी पुजारीने बॉलिवूड स्टार आणि गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांना धमक्या दिल्या होत्या. त्याच्याविरुद्ध कर्नाटक व महाराष्ट्रात मिळून तब्बल ९८ गुन्हे दाखल आहेत. कर्नाटक पोलिसांनी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवल्याने रवी

पुजारी याला पुन्हा अटक करण्यात यश आले

आहे. रवी पुजारी याला भारतात आणण्याची

तयारी सुरु करण्यात आली आहे.