आमदार राहुल कुल निवासस्थानी दाखल, पुष्पवृष्टीने स्वागत



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल हे कोरोनावर मात करून आपल्या राहू येथील निवासस्थानी आज दाखल झाले.

आमदार राहुल कुल हे आपल्या निवासस्थानी येताच त्यांचे औक्षण त्यांच्या पत्नी कांचनताई कुल यांनी केले त्यावेळी दौंडच्या माजी आमदार आणि आ.राहुल कुल यांच्या मातोश्री रंजनाताई कुल या उपस्थित होत्या.

आमदार कुल यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाचे संक्रमण झाले होते. त्यावेळी कुल हे पुण्यात उपचारासाठी दाखल झाले होते. दोनवेळा त्यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर तालुक्यातील जनता चिंतेत होती, मात्र तिसऱ्या टेस्टला त्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडला होता. आमदार कुल हे निवासस्थानी आले असले तरी 2-3 दिवस ते शारीरिक विश्रांती घेतली असे सूत्रांकडून समजत आहे. मात्र जनतेची कामे फोन आणि ऑनलाइन सुरूच आहेत ती थांबणार नाहीत  असे त्यांनी अगोदरच जाहीर केले होते.