माजी सरपंचपती महोदयांनी फासला जनता कर्फ्युला हरताळ, सोशल मीडियावर फोटो शेअर करताच झाला ट्रोल



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्युच्या केलेल्या आव्हानाला संपूर्ण देशात, राज्यात आणि विविध तालुक्यामध्ये चांगला प्रतिसाद मिळत आहे. मात्र येथील एका स्थानिक माजी सरपंचपती महोदयांनी मात्र घरी बसून न राहता आपले उपद्व्याप सुरू ठेवल्याने चांगलेच ट्रोल झाले आहेत. सामाजिक कार्यात काम करणाऱ्यामध्येच जर गंभीरता नाही, तर सर्व सामान्य नागरिकांमध्ये गंभीरता कुठून येणार? असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे. २२ मार्चला संपूर्ण जनता कर्फ्यु असताना,  खबरदारीचे कुठलेली नियम न  पाळता (तोंडाला मास्क न लावता) या महोदयांनी दुचाकीवर बाहेर फिरून फोटो शेषन करत सोशल मीडियावर फोटो टाकल्यानंतर चांगलेच ट्रोल झाले आहेत. अनेकांनी या पती महोदयांची पोस्ट वाचल्यानंतर अरे बाबा तू का बाहेर आला आहे, आत बस, सर्व गाव, तालुका बंद आहे हे आम्हाला माहिती आहे, आता तू पण स्वतःला घरात बंद कर आणि जनता कर्फ्युचे नियम पाळ असे टोमणे मारून त्याला हैराण करून सोडले आहे. आपण सोशल मीडियावर ट्रोल होतोय हे कळल्यानंतर त्या महोदयांची अवस्था मात्र काय बोलावे आणि काय नाही अशी झाली असून आतातरी हे महोदय बाहेर फिरायचे बंद करतील काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.