दौंड : सहकारनामा ऑनलाईन (अब्बास शेख)
– जगातील अनेक देशांमध्ये सध्या कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशातही लॉकडाउन सारखा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. याच पार्श्वभूमीवर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरोधातील लढाईचा निर्धार अधिक बुलंद करताना केलेल्या आवाहनाला देशातून सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.
दौंड तालुक्यामध्येही दौंडचे आमदार राहुल कुल यांनीही त्यांच्या निवासस्थानी आपल्या मातोश्री व दौंडच्या माजी आमदार रंजनाताई कुल, पत्नी व भाजपच्या लोकसभा उमेदवार कांचनताई कुल, मुलगा आदित्य आणि मुलगी मायरा यांसह सोमवारी रात्री नऊ वाजता नऊ मिनिटांसाठी आपल्या अंगणात दिवे उजळवून मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिला. दौंड तालुक्यातही सर्वच नागरिकांनी आपल्या घरासमोरील दारे, गच्ची, बाल्कनीमध्ये उभे राहून दिवे उजळवल्याने इमारती, घरे प्रकाशात उजळून निघत असल्याचे पहायला मिळाले. मोदीजींच्या आवाहनाला तालुक्यातील सर्वच स्तरांतून उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला.