महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी पंढरीनाथ नामुगडे तर उपाध्यक्षपदी गणेश धुमाळ



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या हवेली तालुका अध्यक्षपदी पंढरीनाथ नामुगडे तर उपाध्यक्षपदी गणेश धुमाळ यांची बिनविरोध निवड झाली.जिल्हाध्यक्ष सिताराम लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत त्याची निवड करण्यात आली. 

थेऊर येथील पत्रकार संघाच्या कार्यालयात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी नूतन कार्यकारीणी जाहीर करण्यात आली. तालुक्यातील अनेक पत्रकार या बैठकीस उपस्थित होते. यामध्ये  सुरेश वांढेकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती केली. तालुका कार्यकारीणीवर सल्लागार म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष मारोती कांबळे, मानव अधिकार व भ्रष्टाचार निवारण संघटन पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष खंडू गावडे, दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद वैराट, श्रीनिवास वाघ, विकास शेलार यांची नियुक्ती करण्यात आली तर कायदेविषयक सल्लागार म्हणून वीरेंद्र महाडीक व श्रीनिवास पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे लवकरच इतर कार्यकारीणीची पदे जाहिर करण्यात येतील असे नामुगडे यांनी सांगितले. 

यावेळी पत्रकारांना मार्गदर्शन करताना सिताराम लांडगे म्हणाले की,पत्रकारीता करताना पत्रकार बांधवांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागते अनेक वेळा त्यांच्यावर बाका प्रसंग येतो अशा परिस्थितीत त्याच्या पाठीशी उभे राहून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आजपर्यंत करीत आलेला आहे म्हणून पत्रकारांनी समाजाचे प्रश्न निर्भीडपणे मांडून अन्यायाला वाचा फोडण्याचे काम करावे असे आवाहनही त्यांनी केले