सातारा : सहकारनामा ऑनलाईन
– सातारा जिल्ह्यातून दिल्ली येथील हजरत निजामुद्दीन येथे असणाऱ्या तब्लिग मरकजमध्ये छोटेखानी मेळाव्यासाठी गेलेल्या नागरिकांचे कोरोनाबाबत मोठी माहिती समोर आली आहे. साताऱ्यातून कार्यक्रमासाठी गेलेल्या सात आणि त्यांच्याशी निगडित असणाऱ्या पाच अश्या एकूण १२ जणांचे कोरोना रिपोर्ट हे निगेटिव्ह आले आहेत आणि पसरलेल्या अफवांनाही पूर्णविराम मिळाला आहे त्यामुळे याबाबतच्या अफवांवर कोणी विश्वास ठेवू नये असे आवाहन साताराचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
देशातून हजरत निजामुद्दीन येथे अनेकजण धार्मिक प्रवाचनाच्या कार्यक्रमासाठी गेले होते. सातारा जिल्ह्यातुनही ५ नागरिक या कार्यक्रमासाठी गेल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे या सर्वजनांचे घशातील द्रव्य नमुने NIV मध्ये पाठविण्यात आले होते. त्यातील सर्व बारा जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले असून त्यांना काही दिवस क्वॉरंटाईन मध्ये ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिली आहे. पुढे बोलताना त्यांनी लोकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. सोशल मीडियावर येणाऱ्या अफवांना बळी पडू नये. प्रशासनाकडून वेळोवेळी माहिती देण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोना संसर्ग बाबत भीती न बाळगता काळजी मात्र घ्यायला हवी असे सांगितले आणि शासनाने ज्या उपाययोजना केल्या आहेत. त्या काटेकोरपणे पाळतील अशी अपेक्षा व्यक्त केली.