पुणे : सहकारनामा ऑनलाईन
– देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्यासाठी मीडियाच्या माध्यमातून देशवासियांना आवाहन केले होते. त्यास विविध शहरे आणि गावांतून चांगला प्रतिसाद मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील देलवडी (ता.दौंड) येथे राहणाऱ्या मारुती कुंभार व नंदा कुंभार या शेतकरी दाम्पत्याने मेनबत्ती पेटवुन पसायदान व शुभ करोती म्हणत मोदींच्या आवाहनास प्रतिसाद दिला आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कोरोना व्हायरसच्या विरोधात लढण्याबाबत प्रसार माध्यमातून देशातील जनतेला घरातील सर्व लाईट बंद करून 5 एप्रिलला रात्री 9 वाजता 9 मिनिटे मेणबत्ती, टॉर्च किंवा दिवा लावण्याचे आवाहन केले होते त्या आव्हानाला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळत आहे.