दौंड : सहकारनामा ऑनलाईन
दौंड तालुक्यातील केडगाव येथे दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी त्यांच्या कार्यकत्यांसह दीडशे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. सध्या कोरोना व्हायरसने सर्वत्र हाहाकार माजवला असल्याने संपूर्ण देशात लॉकडाउन करण्यात आले आहे या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक संघटना, राजकीय नेते, कर्तकर्ते आपापल्या परीने गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करत आहेत. आज केडगावमध्येही दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी बाळासो कापरे, राजेंद्र जगताप, राजेंद्र मलभारे, राजेंद्र लक्ष्मण गायकवाड, ज्ञानदेव गायकवाड, सोमनाथ गायकवाड, रमेश बेलगळ यांच्या उपस्थितीमध्ये सुमारे दीडशे गरजू व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले अशी माहिती राजेंद्र जगताप, सोमनाथ गायकवाड यांनी देत जीवनावश्यक वस्तूमध्ये तांदूळ, आटा, गहू, मसूर डाळ व इत्यादींचा समावेश असल्याचे सांगितले.