Categories: Previos News

दौंड शहरातील रस्त्याविरोधात रिपब्लिकन सेनेचा रास्ता रोको



दौंड : सहकारनामा (अख्तर काझी)

दोन राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव- मनमाड राष्ट्रीय महामार्गांतर्गत होणारा रस्ता शहरातून गेलेला आहे, या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. मात्र येथील ओम शांती नगर ते गोल राऊंड दरम्यानच्या रस्ता कामातील अनेक त्रुटींमुळे हा रस्ता जीवघेणा झालेला आहे.

या ठिकाणी अनेक अपघात होऊन जीवित हानी सुद्धा झालेली आहे. त्यामुळे या रस्ता कामातील त्रुटी दूर  करण्याबाबत दौंड नगरपालिका तसेच राज्य रस्ते विकास महामंडळाशी अनेकदा पत्रव्यवहार करूनही हे दोन्ही विभाग नागरिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करून त्यांच्या जीवाशी खेळत आहे. या सर्व परिस्थिती विरोधात दौंड रिपब्लिकन सेनेने  या मार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासना विरोधात निषेध नोंदविला. 

रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी अनिल साळवे व आनंद बगाडे यांच्या पुढाकाराने झालेल्या रास्ता रोको आंदोलनात मोहन सोनवणे, राजू गायकवाड, न. पा. तील राष्ट्रवादीचे गटनेते बादशहा शेख, नगरसेवक कांता साळवे, जिवराज पवार, मोहन नारंग, ॲड.अजित बलदोटा, गुरुमुख नारंग, संजय बारवकर तसेच स्थानिक रहिवाशांनी सहभाग नोंदविला. आंदोलनामध्ये महिलांची उपस्थितीही लक्षणीय होती.

या जीवघेण्या रस्त्यावर दुभाजक व गतिरोधक बनविणे, रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक बंद करणे, रस्त्याला अडथळे ठरणारे विजेचे खांब दूर करणे, रस्त्यावर काही ठिकाणी ड्रेनेज चे काम निकृष्ट झालेले आहे ज्यामुळे ड्रेनेज वारंवार तुटत आहे व त्यामुळे जीव घेणे अपघात होत आहेत यावर उपाययोजना करणे, तसेच ज्या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे ति कामे पूर्ण करणे आदी मागण्या यावेळी आंदोलन कर्त्यांनी केल्या. 

राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता राजेंद्र इंगळे, नगरपालिकेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर,पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी आंदोलन कर्त्यांशी संवाद साधत त्यांच्या मागण्यांवर सात दिवसात अंमलबजावणी करण्याचे आश्वासन दिल्याने आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले, परंतु परिस्थिती जैसे थे राहिली तर पुढचे आंदोलन नगरपालिका कार्यालयात करणार असा इशारा सुद्धा रिपब्लिकन सेनेच्या वतीने यावेळी देण्यात आला.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

12 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago