विधानसभा अधिवेशन विशेष : आशा सेविकांना शासनाने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे : आ.राहुल कुल यांची विधानसभेत मागणी



मुंबई : सहकारनामा ऑनलाइन

आशा सेविकांना शासनाने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला काम द्यावे अशी मागणी दौंड तालुक्याचे आमदार अॅड. राहुल कुल यांनी विधानसभेत केली. महाराष्ट्र परिचारिका विधेयक २०२० मध्ये सुधारणा  सुचविण्यासाठी सुरु असलेल्या चर्चेवेळी ते बोलत होते. त्यांनी या विषयावर विस्तृत माहिती देताना जेवढी नर्सिंग कॉलेज आहेत त्यामध्ये ऍडमिशन चांगले प्रकारे होत आहेत आणि त्या सगळ्यांना नोकऱ्याही चांगल्या प्रकारे मिळताहेत. परराज्यातील परिचारिका याठिकाणी येऊन नोकऱ्या करीत असतील तर मग आपल्या भागातील मुलींना एक चांगली नोकरीची संधी नर्सिंग कॉलेजच्या माध्यमातून निर्माण नक्कीच होऊ शकते आणि इयत्ता दहावी नंतर काही करायचे असेल तर हा एक चांगला पर्याय आहे त्यामुळे नर्सिंग कॉलेजच्या बाबतीतही प्रोत्साहन देऊन ती कॉलेजची संख्या वाढवण्याच्या संदर्भातील धोरण याठिकाणी आपण हाती घ्यावे अशी मागणी त्यांनी केली व आशा सेविका घटक घराघरांमध्ये जाऊन लोकांपर्यंत पोहोचणार घटक आहे. त्यामुळे विविध सर्वेक्षण संदर्भामध्ये वेगवेगळी कामे करणे, मतदान नोंदणी करणे, कमी वेळामध्ये सर्व प्रकारचे सर्वेक्षण करण्याची क्षमता आशा सेविकांमध्ये आहे. परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचे शासनाचे संरक्षण नाही त्यांना सर्वेक्षण देऊन जर शासकीय सर्वेक्षणाची कामे दिली गेली तर त्यांच्या हाताला काम मिळू शकते व त्याचा चांगला उपयोग आपल्या व्यवस्थेमध्ये होऊ शकतो यामुळे आशा सेविकांना शासनाने संरक्षण देऊन त्यांच्या हाताला काम देण्याचा विचार शासनाने करावा अशा प्रकारची मागणी आमदार राहुल कुल यांनी केली.