नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सल्लागारपदी दोन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये सेवा निवृत्त आय.ए.एस अधिकारी अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुल्बे यांचा समावेश आहे. अमरजीत सिन्हा हे 1983 सालच्या बिहार बॅचचे अधिकारी असून भास्कर खुल्बे हे
पश्चिम बंगालचे आयएएस अधिकारी आहेत.
अमरजीत सिन्हा आणि भास्कर खुल्बे हे दोघे
सेवानिवृत्त आहेत. दोन्ही अधिकाऱ्यांचा
कार्यकाळ हा दोन वर्षांचा असणार आहे.
अमरजीत सिन्हा मागिल वर्षी ग्रामविकास
सचिवपदावरून निवृत्त झाले. तर खुल्बे हे निवृत्त होताना पीएमओमध्ये करत होते.