थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
कोरोना संसर्गाच्या फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाॅकडाऊन केल्यानंतर अनेक परप्रांतीय मजुरांना दैनंदिन उदरनिर्वाहचा प्रश्न पडला आहे परंतु अनेक सामाजिक संस्थांनी समाजसेवी संस्था, नागरिकांनी अशा गरजूना मदतीचा हात दिला आहे.परंतु तरीही त्यांच्यामध्ये अस्वस्थता वाढली आहे त्यातच लाॅकडाऊन पुढे ३ मे पर्यंत वाढविला गेल्याने हे बिगारी कामगार हतबल होऊन गुपचूप रात्रीच्या वेळी गावाचा रस्ता धरताना दिसत आहेत. अशाच एका तीस ते पस्तीस जणांच्या घोळक्यास थेऊर मदत केंद्राचे दक्ष पोलिस अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांनी त्यांची समजूत काढून पुन्हा त्याच्या मूळ निवासस्थानी पाठवले. काल बुधवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास परप्रांतीय मजुरांचा घोळका थेऊरमार्गे अहमदनगरच्या दिशेने जात असल्याची माहिती सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे यांना मिळाली त्यांनी तत्परतेने थेऊर येथे पोहोचत या परप्रांतीय नागरिकांना विश्वासात घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेतल्या त्यांना चहा व बिस्किटे दिली आणि परिस्थितीचे गांभीर्य समजावले त्यावर त्यानी पुन्हा त्यांच्या मुळ ठिकाणी मांजरी बुद्रुक येथे एका टेम्पोची सोय करुन पोहोचविण्यात आले.
याबाबत लोणीकळभोरचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी पोलिस आपापल्या परीने चोख व्यवस्था ठेवत आहेत नागरिकांनी घराबाहेर पडू नये शासनाच्या आदेशाचे पालन करावे ही जागतिक महामारी आहे याला हरवण्याचा प्रण आपण सर्व देशवासीयांनी घेतला आहे सहकार्य करावे असे आवाहन केले.