केडगाव-बोरीपारधीमध्ये चार दिवसांचा जनता कर्फ्यु जारी



दौंड : सहकारनामा ऑनलाईन

दौंड तालुक्यातील केडगांव आणि बोरीपार्धी ग्रामपंचायतच्या वतीने गाव आणि सर्व वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांना येणारे चार दिवस जनता कर्फ्यु जारी करण्यात आल्याचे आवाहन करण्यात आले आहे. आज सोमवार दि.27 एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन समिती बोरीपार्धी आणि केडगांव ग्रामपंचायत यांच्यामध्ये झालेल्या बैठकीमध्ये जनता कर्फ्युचा निर्णय घेण्यात आला असून त्यानुसार गुरुवार दि.30 एप्रिल 2020 ते रविवार दि.03 मे 2020 असा चार दिवस जनता कर्फ्यु (संपुर्ण गाव बंद) पाळण्याचे आवाहन  करण्यात आले आहे. या चार दिवसामध्ये फक्त दवाखाने, हाँस्पीटल, मेडिकल, दुध संकलन केंद्रच सुरु राहातील या व्यतिरिक्त कोणताही व्यवहार, व्यवसाय सुरु राहाणार नाही याची सर्व नागरिकांना नोंद घ्यावी असे जाहीर करण्यात आले आहे.

या चार दिवसाच्या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणत्याही नागरिकांनी घराबाहेर पडू नये अन्यथा कलम 144 जमावबंदी व 188 संचारबंदी अंतर्गत या नागरिकांवर कारवाई करणेबाबत पोलीस प्रशासन यांना सक्त आदेश असून सदरच्या आदेशाचे उल्लंघन होणार नाही व कारवाईस समोरे जावे लागणार नाही याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच सोमवार दि.04 मे 2020 पासुन पुर्ववत जुन्या निर्णयानुसार सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी सकाळी 7:00 ते दुपारी 1:00 या कालावधीमध्ये अत्यावश्यक सेवाच सुरु राहिल याची सर्व नागरिकांनी नोंद घ्यावी अशी विनंती केडगावचे सरपंच अजित शेलारपाटील आणि बोरीपारधी ग्रापचे उपसरपंच सुनील सोडनवर यांनी केले आहे.