पुणे : सहकारनामा.
महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या दौंड तालुकाध्यक्षपदी पुण्यनगरीचे पत्रकार प्रशांत वाबळे यांची निवड करण्यात आली आहे. पुणे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे यांच्या हस्ते जिल्हा संघटक अब्बास शेख यांच्या उपस्थितीमध्ये वाबळे यांना पुणे येथील पत्रकार संघाच्या कार्यक्रमात निवडीचे पत्र देण्यात आले. या निडीनंतर वाबळे यांनी बोलताना आपण ग्रामीण भागातील पत्रकारांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देणार असून पत्रकारांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर आवाज उठवून त्यांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितले.
यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची दौंड तालुका कार्यकारिणी पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आली आहे
अध्यक्ष – प्रशांत वाबळे.
कार्याध्यक्ष – अतुल काळदाते.
सरचिटणीस – मानसिंग रुपणवर.
सचिव – विनोद गायकवाड.
उपाध्यक्ष – अलिम सय्यद.
सहसचिव – बापू निखळे.
खजिनदार – राहुल अवचर.
सहखजिनदार – पूजा भोंडवे.
संघटक – आनंदा उर्फ अण्णा बारवकर.
संपर्क प्रमुख – अमोल होले.
सहसंघटक – वाजीद बागवान
सदस्य – सचिन आव्हाड, नेहा सातपुते, योगेश रांधवन, दीपक चौधरी, गणेश चोपडे, मनोजकुमार कांबळे.