थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)
– कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सगळीकडे लाॅकडाऊन असताना लोणीकंद गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पथक मात्र परिक्षेत्रात चालु असलेल्या अवैध धंद्याचा बिमोड करण्यासाठी सतर्क असल्याचे दिसून येत आहे. या पथकाने मागील काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी धाडी टाकून गावठी दारु बनविण्यासाठी चालू असलेले दारूअड्डे उध्वस्त केले आहे. अशीच कारवाई पिंपरी सांडस गावचे हद्दीत गट नं 402 चे बाजूला करण्यात आली आहे. एकजण भट्टी लावून दारू काढत असल्याची बातमी पथकाला मिळाली होती यावेळी
गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नवसागर, गुळ, कच्चे रसायन, भोपळा बॅरल, अल्युमिनियमची ताटली, चाटू, पाणबुडी मोटार, वायर असे इतर साहित्य तसेच 35 लिटर मापाचे 08 कॅनमध्ये एकूण 280 लीटर तयार दारू मिळून आली. ही भट्टी उध्वस्त करुन आरोपी सचिन शंकर नानावत (वय 24 वर्षे रा. रामकृष्ण मंगल कार्यालयाजवळ, अष्टापूर, ता हवेली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याच प्रमाणे तुळापूर-मरकळ रस्त्यावर मौजे वढु खुर्द गावच्या हद्दीत एल.जी कंपनीच्या गोडाऊनमागे स्वतः घराचेसमोर पत्राचे शेड तयार करुन एक महिला भट्टी लावून गावठी दारू काढत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर या ठिकाणी जाऊन खात्री केल्यानंतर तेथे धाड टाकून हतभट्टी तसेच एकूण 40,100/-रु किं चा माल व साहित्य साठा जप्त करण्यात आला असून गुन्हा दाखल केला आहे. तसेच त्याचठिकाणी आजूबाजूला आणखी शोध केला असता एका झोपडीमध्ये एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये 1200/-रु किं चे 60 गावठी हातभट्टीचे फुगे मिळून आले त्यावर ही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी हवेलीच्या उप विभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांनी तपास पथक- पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर, पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, चंद्रकांत माने, श्रीमंत होनमाणे, ऋषिकेश व्यवहारे सुरज वळेकर, सोनाली नरवडे यांनी केली आहे