हमे सरकार को भगानेका नही, बलकी जगानेका है : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस



मुंबई | सहकारनामा ऑनलाईन

सध्या संपूर्ण राज्यामध्ये भाजप आणि त्यांची पुढील रणनीती याबाबत चर्चा सुरू होती. अनेकांनी आज भाजप काहीतरी नवीन मोठा गौप्यस्फोट करेल किंवा राजकीय हादरा देईल असे भाकीत वर्तविले होते. मात्र सर्वांच्या नजरा लागून राहिलेल्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेमध्ये मात्र फडणवीस यांनी आम्हाला सरकार पाडण्यात सध्या कोणताही रस नसून त्यांच्यावर दबाव बनवून त्यांना जागे करण्यात रस असल्याचे म्हणत “हमे सरकार को भगानेका नही है, बलकी जगाने का है” असे सांगत उपस्थित करण्यात अलेल्या सर्व प्रश्नांना विराम दिला आहे.

राज्यात सध्या कोरोनाने कहर केला आहे त्यातच राजकीय अस्थिरता समोर उभी ठाकते की काय अशी परिस्थिती निर्माण झाल्याने अनेकांच्या चिंतेत भर पडली होती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी ही वेळ राजकारण करायची नसून आलेल्या संकटाशी मुकाबला करायची असल्याचे सांगत सरकार जर चुकीच्या पद्धतीने काही करत असेल तर निश्चितच त्यांना त्याबाबत दाब टाकून योग्य काम करायला भाग पाडले जाईल असे सांगितले