राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या सहा जणांवर गुन्हा दाखल



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

– राष्ट्रवादी काँग्रेसच्या धडाडीच्या वक्त्या आणि महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांना फेसबुकवर  अश्लील भाषेत कमेंट करणाऱ्या सहा जणांविरुद्ध पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलेल्या अनेक पोस्टवर हे सहाजण अश्लील कमेंट करत असायचे अशी माहिती मिळत आहे. काही दिवसांपूर्वी रुपाली चाकणकर यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत ट्वीट करत टीका केली होती. या ट्विटचा राग मनात धरुन हे सहाजण रुपाली चाकणकर यांच्या फेसबुक पोस्टवर अश्लील शेरेबाजी करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पुण्यातील सिंहगड रोड परिसरात हा प्रकार घडला असून तक्रारीनंतर पोलिसांनी सहा जणांविरोधात विनय भंग आणि आयटी अॅक्टनुसार गुन्हा नोंद केला आहे.