नवी दिल्ली :
मराठा समाजाच्या आरक्षण प्रकरणी आज दि.15 जुलै रोजी अंतरिम सुनावणी होईल असा अंदाज लावला जात होता मात्र सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्याबाबत निर्णय देण्यात आला नाही.
मात्र 27 जुलैपासून मराठा समाजच्या आरक्षण व इतर शैक्षणिक मुद्द्यावर नियमित सुनावणी केली जाईल अशी माहिती मिळत आहे. आज दि.15 जुलै रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे याबाबत सुनावणी झाली.
सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती एल.एन.राव यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सकाळी ११ वाजता सुनावणीला सुरूवात झाली. यावेळी काही तांत्रिक अडचणी आल्या त्यामुळे पुढील 27, 28, 29 तारखेपर्यंत याचिकाकर्त्यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ राखीव ठेवण्यात आली आहे.