Categories: Previos News

खुनी हल्ल्याचा आरोपी उरुळी कांचन येथील सराईत गुंड ‛लोंढे’ अखेर जेरबंद : एलसीबी पथकाची कारवाई



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखा (एल.सी.बी.) पथकाने उरूळीकांचन येथे झालेल्या खुनी हल्ल्यातील एक महिन्यापासून फरारी असलेला रेकॉर्डवरील सराईत अट्टल गुन्हेगार दत्ता उर्फ भावडया भिमा लोंढे (वय ३० वर्षे रा.उरुळीकांचन ता.हवेली जि.पुणे) यास जेरबंद केले आहे. याबाबत गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांनी माहिती दिली आहे.

दिनांक ७ मे २०२० रोजी रात्री १०.१५ वा.चे सुमारास आकाश अशोक लोंढे (वय २३ वर्षे  रा.उरुळीकांचन, इंदिरानगर) हा त्याचे मोटरसायकलवरून डाळींब उरूळीकांचन रोडने जात असताना त्यास अडवून व खाली  उतरवून पूर्वी झालेल्या शाब्दीक बाचाबाचीचे कारणावरून शिविगाळ दमदाटी करून दत्ता भिमा लोंढे याने त्याचे कडील कोयत्याने व त्याचे इतर ५ साथीदार यांनी लोखंडी रॉड, दांडक्यानी फिर्यादीस ‘तुला जिवंत सोडणार नाही’ असे म्हणून गंभीर मारहाण करून डोक्यावर कोयत्याने वार करत जीवे मारण्याचा प्रयत्न केला होता. याबाबत फिर्यादी आकाश लोंढे याने हॉस्पीटलला उपचार घेत असताना दिलेल्या तक्रारीवरून आरोपींविरुद्ध खुनाचे प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हयातील ६ आरोपींपैकी ५ आरोपी अटक असून मुख्य आरोपी दत्ता लोंढे हा फरार होता. आरोपी दत्ता लोंढे हा सराईत अट्टल गुन्हेगार असून त्याचेविरूध्द यापूर्वी लोणीकाळभोर तसेच श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर या पोलीस स्टेशनला खुनाचा प्रयत्न, मारहाण दुखापत, गर्दीमारामारी, गावठी हातभट्टी गाळणे असे एकूण १३ गुन्हे दाखल आहेत. लॉक डाऊन संचारबंदीचे कालावधीत घडलेल्या सदर गंभीर खुनी हल्ल्यातील आरोपी हा फरार असलेने त्यास पकडणेकामी पोलीस स्टेशन व गुन्हे शाखेचे पथक नेमण्यात आले होते. परंतु सदर आरोपी हा सराईत असल्याने पोलिसांना गुंगारा देत होता. स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांचे मार्गदर्शनाखाली नेमलेले गुन्हे शाखेचे पोलीस पथकातील सहा.पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, पोहवा. महेश गायकवाड, निलेश कदम तसेच उरुळीकांचन दुरक्षेत्राचे पोलीस नाईक सोमनाथ चितारे, सचिन पवार यांचे पथक उरुळीकांचन परिसरात संचारबंदी अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पथकास फरारी आरोपी हा उरुळीकांचन तारा हॉटेल रोड येथे येणार असलेबाबत गोपनीय बातमीदारामार्फत मिळालेलेल्या बातमीवरुन मुख्य आरोपी दत्ता लोंढे यास सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतलेले आहे. आरोपीस पुढील कारवाईसाठी लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे. गुन्हयाचा पुढील अधिक तपास लोणीकाळभोर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक पवन चौधरी हे करीत आहेत. आरोपी दत्ता लोंढे हा गावातील मोलमजुरी करणारे तसेच फेरीवाले, हातगाडी, टपरीचालक यांचेकडून दमदाटी करून फुकट खाणे, पैसे लुबाडणे असे प्रकार करीत असल्याचेही पोलीसांनी सांगितले असून परंतु त्याची परिसरात दहशत असल्यामुळे कोणी तक्रार देत नसल्याचे समजते.

Sahkarnama

Recent Posts

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही

21 तास ago

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

2 दिवस ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

3 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

3 दिवस ago