मुंबई : (सहकारनामा ऑनलाइन)
तीन महिने झाले पण अजूनही या महाविकास आघाडी सरकारला सूर सापडलेला नाही. चहापान ठेवलं पण विरोधकांशी संवाद साधण्यासाठी या तीन पक्षांमध्येच विसंवाद आहे अशी टीका राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी भाजपची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकी नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवताना कर्जमाफी, तूर आणि भात खरेदी, बाजार समिती निवडणुकीतून शेतकऱ्यांना दूर करणं या मुद्द्यावरुन सरकारला घेरणार असल्याचा इशारा दिला.
महाविकास आघाडी सरकार एकाही आश्वासनाची पूर्तता न करता, सरकार घुमजाव करताना दिसत आहे. शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली मात्र अजून ती पूर्ण केलेली नाही. पीक कर्जाशिवाय कुठल्याही कर्जमाफीची माफी नाही. त्यामुळे याला सरसकट कर्जमाफी म्हणता येत नाही असही फडणवीस म्हणाले. आम्ही शेतकऱ्याला मतदार केला होता. पण आपली मक्तेदारी टिकवण्यासाठी तो निर्णय या सरकारने रद्द केला असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला आहे.