Categories: Previos News

अण, नाराज ‛मायराला’ही तिच्या बाबांचा ‛सहवास’ लाभला…



दौंड: सहकारनामा ऑनलाइन(अब्बास शेख)

– नाव ‛मायरा’ वय वर्षे 2, या दोन वर्षांमध्ये तिला कधीही तिचे बाबा (तीही लाडाने त्यांना ‛दादा’च म्हणते) म्हणजेच दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल यांचा पूर्ण सहवास लाभलाच नाही. तिला बाबांना भेटायचे असते म्हणून ती रोज रात्री उशिरापर्यंत जागण्याचा प्रयत्न करते मात्र बाबांची वाट पाहत पाहत स्वप्ननगरीतील परी कधी तिला आपल्या कुशीत घेते हे तिलाही समजत नाही. तीला सकाळी अचानक जाग आल्यानंतर ती धडपडत उठून बाबांना शोधण्याचा प्रयत्न करते मात्र नेहमी प्रमाणे रात्री उशिरा आलेले बाबा सकाळी लवकर उठून घराबाहेर पडलेले असतात. ती रात्री झोपल्यानंतर बाबा घरी येतात आणि सकाळी उठण्यागोदार बाबा घरातून बाहेर पडलेले असतात हा रोजचाच दिनक्रम सुरू असल्याने जनतेच्या तक्रारींचे निवारण करणारे तिचे बाबा मात्र आपल्या या 2 वर्षाच्या छकुलीच्या तक्रारीचे निवारण करू शकत नाहीत अशी तिची स्वतःची तक्रार आहे.



 हीच तक्रार अगोदर आदित्यचीही होती मात्र त्याला या गोष्टीची सवय झाली आहे. आई कांचनताई कुल आणि आजी रंजनाताई कुल यांचा सहवास लाभणारी मायरा मात्र या प्रकारामुळे थोडी बाबांवर नाराज आल्यासारखी वाटत असायची. आता मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून ‛मायराच्या’ चेहऱ्यावर एक वेगळेच हास्य आणि समाधान पाहायला मिळत आहे. वडिलांच्या सहवासापासून दुर्लभ झालेली चिमुकली गेल्या चार-पाच दिवसांपासून बाबांचा म्हणजेच दादांचा  दिवस-रात्र सहवासा लाभत असल्याने सध्या खुश आहे. 



त्यामुळे तिची बाबांच्या बाबत असणारी तक्रारही आता ती पूर्णपणे विसरून गेली आहे. तिला वाटत आहे की आपल्या बाबांनी आपले मन ओळखले आहे आणि त्यामुळे ते आता आपल्याला पूर्ण वेळ देत आहेत. पण तिला हे माहीत नाही की जगामध्ये धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसचा भारतामध्येही मोठा प्रादुर्भाव जाणवत आहे त्यामुळे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अगोदर ‛जनता कर्फ्यु’ आणि आता ‛लॉकडाउन’ची घोषणा केली आहे. याचे पालन सर्वांनीच करावे म्हणून त्यांनी स्वतःही याचे पालन करणार असल्याचे घोषित केल्याने साहजिकच आता याचे पालन सर्व आमदार, खासदारही करत आहेत. हेच पालन दौंडचे आमदारही करत असून तेही आपल्या ‛राहू’ येथील निवासस्थानी थांबून सध्या आपल्या परिवारासोबत वेळ व्यतीत करत आहेत. मात्र त्यांच्या जवळील व्यक्तींच्या माहितीनुसार तिच्या बाबांची एका ठिकाणी स्वस्थ बसून राहण्याची सवयच नाही, आपल्या तालुक्यात असणाऱ्या अडी अडचणी, जनतेच्या तक्रारी, तालुक्याचे विविध प्रश्न शासन दरबारी मांडण्याची त्यांची जुनी सवय आहे त्यामुळे ते ‛कोरोना’चा प्रादुर्भाव कमी होताच जोमाने पुन्हा कामाला लागतील आणि  या 2 वर्षाच्या चिमुकलीला पुन्हा हा प्रश्न पडेल की आपले बाबा आपल्याला वेळ का देत नाहीत या प्रश्नाचे उत्तर तिला या कमी वयात समजत नसले तरी तालुक्याच्या जनतेला मात्र याचे उत्तर चांगलेच माहीत आहे की तिचे बाबा गेल्या वीस वर्षांपूर्वीच राजकारणात पूर्णपणे सक्रिय झाले असून दौंडचे सलग दुसऱ्यावेळी निवडून आलेले विद्यमान आमदार आहेत. त्यांचे वडिल आणि मायराचे आजोबा दिवंगत आमदार कै.सुभाष अण्णांच्या अचानक जाण्याने अवघ्या 22-23 व्या वर्षीच त्यांच्यावर  मोठी जबाबदारी येऊन पडली. हातात बॅट घेऊन गावातील मैदानावर क्रिकेट खेळणाऱ्या युवकावर अचानक वडिलांचा वारसा आणि तालुक्याची जबाबदारी येऊन पडल्याने युवा अवस्थेत रंगविलेल्या स्वप्नांचा अक्षरशः चुराडा करून तालुका आणि तालुक्याच्या जनतेचे प्रश्न, अडीअडचणी, सोडविण्याचे काम सुरू झाले ते आजही सुरू आहे. कामाचा भार वाढत जाऊन दिवसाचे 18 तासही कमी पडू लागल्याने परिवारातील सदस्यांनाही वेळ देणे जिकिरीचे होऊन बसले आहे हे आणि हे सुरूच राहणार आहे हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. त्यामुळे चार-पाच दिवसांपासून दिवस-रात्र वडिलांचा सहवास लाभत  असणारी मायरा काही दिवसांनी पुन्हा बाबांवर म्हणजेच तिच्या लाडक्या ‛दादांवर’ रुसली किंवा नाराज झाली तर आश्चर्य वाटायला नको…

Abbas Shaikh,

Editor: Sahkarnama

(News Paper & News Portal)

© Warning – All content is Copyright

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

18 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago