दौंड तालुक्यातील रेशन दुकानदारांना मोठा झटका, निलंबित करण्यात आलेल्या ‛त्या’ दुकानांचे परवाने कायमचे रद्द!



दौंड : सहकारनामा ऑनलाईन –

दौंड तालुक्यातील निलंबित करण्यात आलेल्या ‛त्या’ सहा रेशन दुकानदारांचे स्वस्त धान्य वितरण केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असल्याची माहिती पुरवठा अधिकारी प्रकाश भोंडवे यांनी सहकारनामा ला दिली आहे. 

राज्यात कोरोनाचे मोठे संकट असताना धान्य वितरणामध्ये कालाबाजर होत असल्याच्या तक्रारी संबंधित खात्याकडे आल्या होत्या त्या अनुषंगाने यामध्ये दोषी आढळलेल्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती मात्र त्या सर्व दोषी आढळलेल्या दुकानदारांचे परवाने रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आल्याने दौंड तालुक्यात एकच खळबळ माजली आहे.

या दुकांदारांविरुद्ध, पावती न देणे, कमी प्रमामात धान्य वाटप करणे, धान्य वाटप नाकारणे, शिधापत्रिकाधारकांना हेलपाटे मारायला लावणे अशा अनेक प्रकारच्या तक्रारी महसूल खात्याला आलेल्या होत्या.

यानंतर प्रशासकिय पातळीवर याची गंभीर दखल घेतली जाऊन पडताळणी करण्यात आली असता दौंड शहरातील 2, गोपाळ वाडीतील 2, सोनवडी येथील 2, मळद, यवत असे दौंड तालुक्यातील एकूण 8 स्वस्त धान्य वितरण केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे.