पाटस टोलप्लाझावर ‛पोलिसांकडून’ वाहन चालकांना ‛मास्क’ चे वाटप



पुणे : सहकारनामा ऑनलाइन

कोरोनाच्या प्रादुर्भाव काळात अनेक वाहनचालक हे विना मास्क फिरत असल्याने कोरोना संक्रमण वाढू शकते. 

नेमकी ही बाब पोलीस अधिकाऱ्यांनी ग्राह्य धरून पाटस टोलप्लाझा येथे विना मास्क वाहन चालकांना मास्क चे वाटप करून त्याचे महत्व पटवून दिले आहे.

अपर पोलीस महासंचालक सो, वाहतूक म.रा.मुंबई यांचे सूचना प्रमाणे व पोलीस अधिक्षक सो, महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग पुणे यांचे मार्गदर्शनाप्रमाणे म पो केंद्र बारामती फाटा अंतर्गत पाटस टोल प्लाझा याठिकाणी ज्या वाहन चालकांकडे मास्क नाहीत त्याना मास्क चे वाटप करण्यात आले.

त्याच बरोबर वाहतुक नियमाचे पालन करणे करिता वाहन चालकांना प्रबोधन करण्यात आले. यावेळी सपोनि युवराज नांद्रे, कर्मचारी.म पो केंद्र बारामती फाटा हे उपस्थित होते.