बारामतीमध्ये सापडलेला त्या संशयित ‛कोरोना’ रुग्णाचा अहवाल येणे बाकी, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : बारामती आरोग्य अधिकारी डॉ.काळे



: सहकारनामाऑनलाईन

बारामती शहरामध्ये एक कोरोना संशयित रुग्ण सापडला असल्याची पोस्ट  सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर बारामतीमध्ये मोठी खळबळ माजली असून बारामतीमध्ये सापडलेल्या त्या रुग्णाच्या कोरोना टेस्टचा  अहवाल अजून आलेला नाही त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन बारामती आरोग्य अधिकारी डॉ.काळे यांनी सहकारनामा च्या माध्यमातून केले आहे.

बारामती मध्ये एक कोरोना संशयित रुग्ण सापडला असून कुणीही घराबाहेर पडू नये अश्या आशयाची पोस्ट समाज माध्यमांवर फिरत होती याबाबत आम्ही बारामतीचे तालुका अधिकारी डॉ.काळे यांच्याकडून याबाबत माहिती घेतली असता बारामती मधून एका रुग्णाला नायडू हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आले असून त्याच्या घशातील द्रव्यपदार्थांची नमुने घेऊन ते एन.आय.व्ही (National Institute of Virology) कडे पाठविण्यात आले असून त्यांच्याकडून जो पर्यंत अहवाल येत नाही तोपर्यंत तो रुग्ण पॉझिटिव्ह असल्याचे आपण जाहीर करू शकत नाही अशी माहिती त्यांनी दिली.