आमदार राहुल कुल यांच्याहस्ते केडगाव येथे ॲम्बुलन्स लोकार्पण सोहळा



|सहकारनामा|

दौंड : केडगाव (ता.दौंड) येथे केडगाव ग्रामपंचायत च्या वतीने लोकांसाठी खरेेदी करण्यात आलेली ॲम्बुलन्सचा लोकार्पण सोहळा तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या हस्ते पार पडला.

आमदार राहुल कुल यांनी केडगाव येथे  कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी केडगाव हे मोठे गाव आहे, त्यामुळे तुम्ही एक ॲम्बुलन्स खरेदी करावी अशी सूचना त्यावेळी केली होती. त्या सूचनेनुसार केडगाव ग्रामपंचायत ने 14 व्या वित्त आयोग फंडातून ही रुग्णवाहिका खरेदी करत ही ॲम्बुलन्स  केडगाव आरोग्य केंद्राकडे आज सुपूर्त केली. ॲम्बुलन्स सर्वांसाठी फ्रि असेल यासाठी  एक टोल फ्री नंबर दिला जाणार आहे. 

या कार्यक्रमासाठी आमदार राहुल कुल यांसह सरपंच अजित शेलार पाटील,  उपसरपंच अशोक हंडाळ, भातीय  जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे, विकास शेलार, आप्पासो हंडाळ, शिवाजी सूळ, प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी, कर्मचारी, तसेच किरण देशमुख, शहाजी गायकवाड, केडगाव ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार ग्राप सदस्य नितीन जगताप यांनी मानले.