वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोना योद्ध्यांचा सन्मान, पीपीई किटचे मोफत वाटप



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन (शरद पुजारी) 

येथील रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक कार्यकर्ते खंडू गावडे, आनंद वैराट व गणेश गावडे यांनी कोरोनाशी दोन हात करणाऱ्या योद्ध्यांचा सन्मान करत  आरोग्य कर्मचाऱ्यांना पी.पी.ई सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. 

थेऊरमध्ये तीन महिन्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नाही परंतु मागच्या आठवड्यात अचानक सहा रुग्ण आढळून आले दरम्यान येथील आरोग्य कर्मचारी महसूल विभाग पोलिस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासन यांनी केलेल्या अथक प्रयत्नानंतर हा फैलाव रोखण्यात यश आले त्यामुळे या कोरोना योद्ध्यांचा सन्मान करणे ही आपली सामाजिक बांधिलकी असल्याचे रिपब्लिकन पक्षाचे हवेली तालुका अध्यक्ष मारुती कांबळे यांनी सांगितले. आज बुधवारी त्यांच्या वाढदिवसानिमित्त तंटामुक्त अध्यक्ष सुदाम गावडे यांच्या हस्ते कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी मेहबूब लुकडे, थेऊर उपकेंद्रातील आरोग्य अधिकारी डाॅ पुजा सूर्यवंशी, आरोग्य सेवक प्रशांत बिराजदार, सेविका भारती सोनवणे तसेच सर्व आशा सेविकांना आरोग्य सुरक्षा पी पी ई कीट भेट देण्यात आले तर ग्रामविकास अधिकारी बाळासाहेब कांबळे, गावकामगार तलाठी दिलीप पलांडे व आरोग्य कर्मचाऱ्यांना सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मिलिंद  गुरव यांचा विशेष कोरोना योध्दा म्हणून सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी श्रीनिवास वाघ, संतोष गायकवाड, सरवर शेख, पवनकुमार गुप्ता आदी उपस्थित होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

3 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

16 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

18 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

20 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago