देऊळगाराजेत रक्तदान शिबिर संपन्न



देऊळगांव राजे : सहकारनामा ऑनलाईन(प्रशांत वाबळे)

– बुधवार दि.१ एप्रिल रोजी  श्रीकृष्ण मित्रमंडळ देऊळगाव राजे  व रोटरी ब्लड बँक दौंड यांच्या सयूंक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिर आयोजित केले होते. कोरोना या आजारामुळे निर्माण झालेला रक्ताचा तुटवडा भरून काढण्यासाठी फूल ना फुलाची पाकळी म्हणून आपलाही खारिचा वाटा व्हावा या उद्देशाने याशिबिराचे आयोजन केले असल्याचे संयोजक अभिमन्यु गिरमकर यांनी सांगितले. सध्या सर्व देशात लॉकडाउन असल्यामुळे याचे सर्व नियम पाळून आवश्यक सर्व शासकीय परवानगी घेऊन हे रक्तदान शिबिर पार पडले. सर्वांनी सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान केले त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार सयोजकांच्या वतीने  करण्यात आले. रक्त संकलन बॅग कमी पडल्यामुळे  काही जणांना रक्तदान करता आले नाही अशी खंत या वेळी रक्तदात्यांनी बोलून दाखवली. या वेळी सोशल डिस्टन्सीचे सर्व नियम पाळन्यात आले. एका वेळी संकलन ठिकाणी बरोबर एक एकाला बोलउन रक्त संकलन करण्यात येत होते. या कामी श्रीकृष्ण मित्र मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी विशेष प्रयत्न करुण चोख नियोजन पार पाडले. रोटरी ब्लड बँकेचे सोमनाथ सोनवणे आणि त्यांच्या टीमने या कामी मोलाची साथ दिली. या वेळी ५०बॅग रक्त संकलन करण्यात आले.