लोणीकंद पोलिसांकडून कोलवडीमध्ये ‛पाच’ हातभट्ट्या उध्वस्त



थेऊर : सहकारनामा ऑनलाईन(शरद पुजारी)

– कोलवडी (ता.हवेली) गावचे हद्दीत शितोळे वस्ती येथे मुळा मुठा नदीच्या  कडेला दोन गावठी दारुच्या  भट्टी लावलेल्या असून कच्चे रसायन तयार करून दारू काढत असल्या बाबत  खात्रीशीर बातमी मिळाल्यावर लोणीकंद पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या आदेशाने गुन्हे प्रकटीकरण पथक रवाना होवून या हातभट्टीवर  छापा घातला असता त्या ठिकाणी गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे साहित्य नवसागर, गुळ, कच्चे रसायन, भोपळा बॅरल, अल्युमिनियमची ताटली, चाटू असे इतर साहित्य मिळून आले. या छाप्यामध्ये एकूण रु. 23,500/ किंमतीच्या रसायनांचा व साहित्याचा नाश करण्यात आला असून भट्टी उध्वस्त करण्यात आली आहे. त्यानंतर लोणीकंद पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक हणमंत पडळकर यांनी लोणीकंद पोस्टेचे डी बी पथक- पोलीस हवालदार बाळासाहेब सकाटे, दत्ता काळे, समीर पिलाने, ऋषिकेश व्यवहारे, श्रीमंत होनमाने सहभाग घेतला