भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या सांगली जिल्हा दौऱ्यावर

सुधीर गोखले

सांगली : भारतीय जनता पार्टी चे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या दि ५ ऑकटोबर रोजी सांगली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत अशी माहिती सांगली लोकसभा समन्वयक  शेखर इनामदार, आणि शहर-जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी दिली.

‘महाविजय २०२४’ अंतर्गत सांगली लोकसभा मतदार संघामध्ये विधानसभा निहाय ते आढावा घेतील आणि कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील आणि करतील. यावेळी ‘घर चलो’ अभियान राबवले जाईल. त्यानुसार नागरिकांशी ते संवाद साधतील. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचे उद्या म्हणजेच गुरुवारी सर्वप्रथम तासगाव मध्ये आगमन होईल. तासगाव-कवठेमहांकाळ, जत, खानापूर, आटपाडी, विटा मतदारसंघाचा ते आढावा घेतील. दुपारी तीन वाजता ते मिरज येथे मिरज, पलूस, कडेगाव मतदारसंघाचा आढावा घेतील. 

तासगाव मध्ये गणपती मंदिर ते बागणे चौक ‘घर चलो’ अभियानांतर्गत पदयात्रा निघेल पदयात्रेचा समारोप जाहीर सभेने बागणे चौकात होईल. तेथे नियोजनानुसार तासगाव मधील जेष्ठ कृषी तज्ञ नारायण म्हेत्रे यांची भेट होईल. जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग म्हणाले, ‘भाजप ने २०२४ सालच्या होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीवर भर दिला असून, त्यानुसार प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांचा राज्यभर दौरा सुरु आहे. प्रत्येक विधानसभा मतदार संघातील पहिल्या फळीतील सुमारे सव्वाशे कार्यकर्त्यांचा समावेश त्यांच्याशी होणाऱ्या चर्चेसाठी असेल.

मिरज मध्ये पालकमंत्री सुरेश खाडे यांचे संपर्क कार्यालय ते बालगंधर्व नाट्यगृह असे ‘घर चलो’ अभियान होईल यावेळी या पदयात्रेचा समारोप बालगंधर्व नाट्यमंदीरात त्यांच्या मार्गदर्शन सभेने होईल. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, माजी सभापती धीरज सूर्यवंशी, माजी आमदार दिनकर पाटील, पृथ्वीराज पवार, ऍड स्वाती शिंदे, नीता केळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांच्यासह भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.