Birthday MLA Rahul Kool – आमदार ‛राहुल कुल’ यांच्या वाढदिवसानिमित्त अनाथ मुलांना शालेय वस्तूंचे वाटप



दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्याचे विद्यमान आमदार राहुल कुल यांच्या वाढसानिमित्त त्यांच्या कार्यकर्त्यांनी वाढदिवसाचा अनाठायी खर्च टाळत अनाजी खाडे आश्रमातील अनाथ मुलांना शालेय साहित्य व जिवनाश्यक वस्तू वाटप केल्या.

30 ऑक्टोबर रोजी आमदार राहुल कुल यांचा वाढदिवस असतो. या वाढदिवसानिमित्त दौंड तालुक्यातील युवावर्गाने सोशल मिडियावर अक्षरशः शुभेच्छांचा पाऊस पाडला होता. प्रत्येकाने आपापल्या परीने दादांना शुभेच्छा दिल्या. तर अनेक ठिकाणी वृक्षारोपण, मास्क वाटप, आणि अनाथ आश्रमांमध्ये जाऊन तेथील मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले आहे. 

गलांडवाडी येथे हि अनाजी खाडे आश्रमातील अनाथ मुलांना शालेय साहित्य व जिवनाश्यक वस्तू वाटप करण्यात आले.

याप्रसंगी गलांडवाडीच्या मा. सरपंच ज्योती शितोळे, कोमल शितोळे, प्रज्वल शिंदे, प्रनित दोरगे, शुभम नवले, तुषार लाटकर, तुषार शेळके, प्रशांत पवार, सागर सरोदे हे उपस्थित होते.