नवी दिल्ली : वृत्तसेवा
माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून याबद्दल माहिती दिली आहे. प्रणव मुखर्जी यांनी ट्विटमध्ये म्हटले की, रुग्णालयात तपासणीनंतर मला कोरोना विषाणूची लागण झाली आहे. गेल्या एका आठवड्यात माझ्याशी संपर्क साधलेल्या सर्व लोकांना मी आवाहन करतो की या सर्वांनी आपली चाचणी घ्यावी व तो पर्यंत स्वतःला क्वारंटाईन करून घ्यावे.
अलीकडेच अनेक राजकारणी आणि VIP लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचा यात प्रामुख्याने समावेश आहे. सध्या अमित शहा, अमिताभ आणि शिवराजसिंह चौहान हे कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत.