चौफुला, दौंड : दौंड तालुक्यातील चौफुला, बोरिपार्धी हद्दीत पुणे सोलापूर महामार्गावर ईर्टिका कार आणि खाजगी बस ट्रॅव्हल चा अपघात होऊन या अपघातामध्ये गणेश यादवबापू दिवेकर (संपूर्ण नाव समजले नाही,रा.वरवंड, ता.दौंड) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्याचा मित्र साबळे हा गंभीर जखमी झाला आहे.

मिळत असलेल्या माहितीनुसार आज सकाळच्या सुमारास पुणे दिशेकडे निघालेल्या खाजगी ट्रॅव्हल बस ने महामार्गचे डिव्हायडर तोडून ती वरवंड दिशेकडे निघालेल्या इर्टीका कारला समोरून धडक दिली. या भिषण अपघातामध्ये कार मधील गणेश दिवेकर हा गंभीर जखमी होऊन जागीच मृत झाला तर त्याचा मित्र साबळे हा गंभीर जखमी झाला असून त्याला स्थानिक नागरिकांनी खाजगी दवाखान्यात भर्ती केले आहे.