केडगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज विविध रस्त्यांचे भूमिपूजन, विकासकामांमध्ये राजकारण न करता सर्वांगीण विकासावर भर – बाळासो कापरे

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव ग्रामपंचायतच्या वतीने आज केडगावमधील विविध रस्त्यांचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषदेचे मा.सदस्य राहुल उर्फ बाळासो कापरे, केडगावच्या विद्यमान सरपंच सौ.पुनम गौरव बारवकर, उद्योजक रोहीत गजरमल, सौ. शैलजा पितळे, सौ. जबीन शिकिलकर, मा. उपसरपंच ज्ञानदेव गायकवाड, माजी सरपंच राजेंद्र गायकवाड, मा. सदस्य राजेंद्र जगताप, गौरव बारवकर, सचिन दरेकर, राहुल पितळे, ताहेर शिकिलकर, आप्पा बारवकर, बाळासो गरदडे, नायकू गरदडे, विजूशेठ पितळे, अनिल गायकवाड, राजेंद्र गायकवाड, रामभाऊ गायकवाड, लतीफभाई खान, फकीर पठाण, शब्बीर सय्यद, मुबारक पठाण, पोपट जगताप, शाहरुख शेख, सोहेल पठाण, सुधीर गायकवाड, भाऊसाहेब रोडे, अक्षय गायकवाड, गजानन गायकवाड, अनिकेत कांबळे, अनिश कांबळे, मुस्तफा इनामदार,जियान शेख, शिवाजी गायकवाड, प्रथमेश गायकवाड, कॉन्ट्रॅक्टर बारवकर, देशमुख, दिवेकर, कोटलीकर यांसह केडगावमधील विविध मान्यवर, ग्रामस्थ उपस्थित होते.

केडगाव गावातील अंतर्गत रस्त्यांमध्ये मुस्लिम वस्ती, गायकवाड वस्ती, कांबळे वस्ती, ज्ञानदेव जगताप घर ते नासिर पठाण – गायकवाड घर, रोडे घर – वीर उमाजी नाईक वस्ती अंतर्गत रस्ता असे गावातील तीन रस्ते तसेच बेबी कॅनॉल ते गिरमे विहीर, कॅनॉल ते येळे वकील साहेब घर आणि नायकू गरदडे ते पोतदार अश्या सहा रस्त्यांचे भूमिपूजन पार पडले.

भूमिपूजन कार्यक्रमावेळी मा. जिल्हापरिषद सदस्य राहुल कापरे यांनी बोलताना, विकास कामे करत असताना केडगावातील कोणत्याही घटकावर अन्याय होऊ दिला जाणार नाही. प्रत्येक वार्ड, वाडी आणि वस्तीमध्ये नागरी सुविधा, रस्ते यावर विशेष भर देणार असल्याचे त्यांनी सांगितले. जे मुख्य रस्ते 10 वर्षापूर्वी व्हायला हवे होते ते कुटील राजकारणाचा बळी ठरले आणि ते आजपर्यंत होऊ शकले नाहीत मात्र आम्ही गट-तट न पाहता सरसकट सर्वांगीण विकासावर भर देणार आहोत. तश्या सूचना विद्यमान सरपंच आणि त्यांच्या सहकारी सदस्यांना देण्यात आल्या आहेत त्यामुळे ग्रामस्थांनी बिनधास्त रहावे आणि त्यांच्या वार्डमधील अडी-अडचणी आमचे सरपंच, सदस्य किंवा थेट आम्हाला सांगाव्यात त्या सोडविण्याचे काम आम्ही करू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले.
केडगावमधील रस्ते आणि इतर नागरी सुविधा देण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही फंड आणत आहोत आणि त्यातून आम्ही केडगावचा सर्वांगीण विकास करू असेही शेवटी त्यांनी म्हटले.