Categories: सामाजिक

केडगाव मध्ये ‘भीम जयंती’ उत्साहात साजरी

दौंड : दौंड तालुक्यातील केडगावमध्ये भीम जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या जयंतीनिमित्त प्रथम रॅली काढण्यात येऊन नंतर गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले तसेच विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

दिवसभर रॅली आणि सामाजिक उपक्रमानंतर केडगाव स्टेशन येथे सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणूकीनंतर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व करार्यक्रमाचे आयोजन रोहित गजरमल, प्रथमेश गायकवाड, भीम क्रांती मित्रमंडळ यांच्यावतीने करण्यात आले होते.

आयोजित सभेला झुंबर गायकवाड (मा.सभापती, पंचायत समिती दौंड) दिलीप हंडाळ (मा.सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती) मनोहर कांबळे (व्हा.चेअरमन केडगाव विका.) ग्राप. सदस्य मनोज शेळके, नितीन जगताप, माऊली शेळके, राजेंद्र शेळके, विष्णू कांबळे, सुरेश गजरमल,अनिल कांबळे, चंद्रकांत गजरमल, पांडुरंग गजरमल हे आवर्जून उपस्थित होते.

तर ही जयंती यशस्वी करण्यासाठी विकास अनिल कांबळे, विकास विष्णू कांबळे, प्रमोद गजरमल, अनिकेत कांबळे, सागर गजरमल, मयूर काकडे, किसन कांबळे, राहुल कांबळे, अनिकेत जोगदंड, रोहित सूर्यवंशी, सिद्धार्थ तूपारे, प्रणव डेंगळे, सागर खांडेकर, विशाल अवधूते, वेदांत अवधूते, सोहेल, रेहान यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर राजपुरे, कार्यक्रमाचे प्रास्ताविक विकास कांबळे तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रथमेश गायकवाड यांनी केले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago