भिगवण जवळ पोलीसांनी 35 किलो गांजा पकडला

भिगवण : भिगवण पोलीसांनी दमदार कामगिरी करत सुमारे ३५ किलो ८ ग्रॅम अमली पदार्थ असणारा गांजा व साधणे असा एकुण ६, लाख १६ हजार २८० रूपये किंमतीचा मुददेमाल पकडला असून हा माल वाहतुक करणाऱ्या इसमास जेरबंद केले आहे.
भिगवण पोलीस अमली पदार्थ विरोधी मोहिम
राबवित असताना त्यांना डिक्सळ गावच्या हद्दीत राशिन ते भिगवण रोडवर नाकाबंदी करीत असताना त्यांना गुप्त खबऱ्यामार्फत एक इसम हा मोटार सायकल वरून आमली पदार्थ घेवुन येणार असल्याची माहिती मिळाली होती.
यावेळी भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक दडस पाटील, पोसई, सुभाष रूपनवर, पोलीस उपनिरीक्षक, डी.बी.जाधव, पो.हे.कॉ.ब.नं.४७,एस.ए.पवार, पो.ना.ब.नं.२०५९, ए.एम.माने.पो.कॉ.१४६२, एम के बोरूडे, पो.कॉ.ब नं.२७५८,एच.एच.मुलाणी, पो.कॉ. ब.नं.२७२६, म.पो.हे.कॉ. वाबळे, ब.नं.३०५४, यांना तात्काळ मदतीस पोलीस स्टाफ घेवुन दुपारी साडेतीन वाजता डिक्सळ या ठिकाणी सापळा रचला होता. यावेळी तेथे एक मोटार सायकलवर एक संशयित इसम पाठीमागे पाढरे रंगाचे गोणीमध्ये काहीतरी घेवुन येताना दिसला. त्यावेळी पोलिसांनी लागलीच मोटार सायकल स्वारास ताब्यात घेवुन त्याच्याकडे विचारपुस केली असता त्याने त्याचे नाव सुनिल अनिल जाधव, (वय, २४ वर्ष, रा. सासवड, उदाचीवाडी, ता. पुरंदर, जि पुणे) असे असल्याचे सांगितले.
यावेळी पोलिसांना त्याच्याकडे त्याचे
३५ किलो ०८ ग्रॅम वजनाचे आंमली पदार्थ गांजा व एक होंडा शाईन मोटार सायकल असा एकुण
६ लाख १६ हजार २८० रूपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला तो पोलिसांनी जप्त केला आहे. याबाबत भिगवण पोलीस स्टेशन
येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी ही डॉ.अभिनव देशमुख (पोलीस अधीक्षक,पुणे ग्रामीण) मिलींद
मोहीते (अपर पोलीस अधीक्षक, बारामती विभाग, पुणे ग्रामीण) गणेश इंगळे (उपविभागीय
पोलीस अधीकारी, बारामती विभाग) यांचे मार्गदर्शनाखाली भिगवण पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक दिलीप पवार, सहा.पोलीस निरीक्षक, विनायक दडस पाटील, सुभाष रूपनवर, पोलीस उपनिरीक्षक, पोलीस अमलदार दत्तु जाधव, रामदास जाधव, सचिन पवार, महेश उगले, अंकुश माने, हसीम मुलाणी, महेश बोरूडे, कल्पना वाबळे, होमगार्ड नितीन धुमाळ, पोलीस मित्र विशाल गुरगुळे,यांनी केली आहे.