Categories: पुणे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बारामतीत काढण्यात आलेल्या मिरवणूकीतील ‘नऊ’ डीजेंवर गुन्हा दाखल

बारामती : डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित काढण्यात आलेल्या मिरवणुकीत डीजे वाजवीणाऱ्या 9 डीजे चालक, मालकांवर भा.द.वि. कलम 290, 291, 188, सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत नवनाथ चांगदेव शेडगे (वय 34 वर्षे पोलीस नाईक, नेमणुक बारामती शहर पोलीस स्टेशन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीस नाईक शेडगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून 1) डी. जे. जय मल्हार साऊंड, विजय गेजगे टेम्पो नं. MH-20-AA-9141, 2) डि.जे. ओम साई ऑडीओ कोल्हापुर, चेतन रोगडाळकर टेम्पो नं. MH-17-T- 5169 3) डि. जे क्राऊंड किंग प्रदिप ऑडीओ फलटण, प्रदिप जगताप टेम्पो नं. MH-12-AU-4163 4) डि. जे हाय टायगर नं. 1 कराड, ऋषीकेश सुर्यवंशी टेम्पो नं. MH-48-T-8033 5) खिलाडी ऑडिओ कराड अमोल गुरव कराड टे म्पो नं. MH-04-FD-3871 6) सोनजाई डी. जे. याचा टेम्पो नं. MH-14-CP-7392 चालक व मालक, 7) तनिष्का ऑडीओ 2020 यांचा टेम्पो नं. MH-12-GT-2884चे चालक व मालक, 8) मुळीक मंडप फलटण यांचा टेम्पो नं. MH-42-8-9530 चे चालक व मालक, 9) महालक्ष्मी साऊंड यांचा टेम्पो नं. MH-43-E-5748 चे चालक व मालक पुर्ण नाव पत्ता माहित नाही. यांच्यावर बारामती शहर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. 13/04/2024 रोजी सायंकाळी 5:00 पासुन ते रात्री 10:00 वाजेपर्यंत वरील आरोपिंनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्याकडील टेम्पोमध्ये धोकादायक रित्या साऊड लावून डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते इंदापुर चौक पर्यंत रोडचेकडेला असलेले हॉस्पीटलकडे दुर्लक्ष करून मोठ्याने आवाज वाढवुन सार्वजनिक शांततेचा भंग करीत असताना वेळोवेळी यांना डिजे साउंड सिस्टीम थांबविण्याच्या सुचना देऊनही जिल्हाधिकारी पुणे यांचेकडील आदेश क्रमांक 1480/24, दि.03/04/2024 अन्वये मुबई पोलीस अधिनीयम 1951 चे कलम 37(1)(3) चा अंमल पुणे ग्रामीण जिल्ह्यात दिनांक 05/04/2024 पासुन 18/04/2024 पर्यंत असतानाही दिलेल्या आदेशाचे उल्लंघन केले आहे असे फिर्यादित म्हटले आहे.

त्यामुळे डीजे वाजवीणारे चालक व मालक यांच्या विरुद्ध भा.द.वि कायदा 290, 291, 188 सह मुंबई पोलीस कायदा कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोसई देशमुख करीत आहेत.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

6 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago