अख्तर काझी
दौंड
प्रॅक्टिशनर लॉयर्स बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड.शशिकांत गायकवाड यांची व उपाध्यक्षपदी अॅड. अमोल काळे यांची बिनविरोध निवड झाली. तर सचिवपदी अॅड. आसिफ शेख यांची निवड करण्यात आली.
11 सदस्यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये अॅड. किरण लोंढे, शरद नरुटे, मयुरी उंडे, स्वाती जाधव, सागर शेळके, शितल मोरे, प्रतीक डाळिंबे, अर्चना लांडे या वकिलांची निवड झाली आहे. संघटनेमध्ये 78 वकिलांचा समावेश असल्याची माहिती नवनिर्वाचित उपाध्यक्ष अमोल काळे यांनी दिली. सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा संघटनेच्यावतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.